Google Station प्रकल्प बंद; आता रेल्वे स्थानकांवर नाही मिळणार Free WiFi सेवा
Free Wi-Fi (photo Credit: Wikimedia Commons)

गूगलकडून (Google) गेल्या 5 वर्षापासून रेल्वे स्थानकावर (Railway Station) सुरू असलेली फ्री वायफाय (Free WiFi Service) सेवा बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापुढे रेल्वे प्रवाशांना नेटवर्क संदर्भात अडचणींचा सामना करावा लागणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मोबाईल आणि इंटरनेट ही आता सर्वांसाठीच महत्त्वाची गरज झाली आहे. सध्या कोणतेही काम करायचे असो त्यासाठी मोबाईल लागतोच. मुंबईची लाइफलाईन असलेल्या लोकलमध्ये या मोबाईलचे नेटवर्क गेल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती. अनेकांना जास्त काळ प्रवास करायचा असल्याने नेटवर्क गेल्यावर त्यांची कामेही खोळंबायची. प्रवाशांची हीच गैरसोय टाळण्यासाठी गूगल स्टेशन प्रकल्प सुरु करण्यात आला होता.

देशातील सर्व रेल्वे स्टेशनांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी लोकसभेत दिली होती. त्यानुसार, रेल्वे स्थानकावर 2016-2017 च्या दरम्यान 100 , 2017-2018 मध्ये 200 तर, 2018-2019 या वर्षात 500 वायफाय सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. परंतु, आता बहुतांश ठिकाणी इंटरनेट डेटा स्वस्त आणि अगदी सहजपणे उपलब्ध आहे. सरकारकडून सगळ्यांना इंटरनेटची सेवा मिळावी यासाठी पावले उचलली जात आहेत. इंटरनेटबाबतच्या परिस्थितीत कमालीची सुधारणा झाली आहे. तर, काही देशांमध्ये या प्रोजेक्टसाठी तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतोय, यामुळे हा प्रोजक्ट बंद करण्यात येत आहे, असे कारण देत गुगलकडून फ्री वायफाय सेवा बंद करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, रेलकडून पुरवली जाणारी वायफाय सुविधा सुरूच राहील असेही समजत आहे. तसेच 5 हजारहून अधिक रेल्वे स्थानकांवर ही सुविधा मिळाणार असल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- Women Officers in Army: भारतीय लष्करामध्ये तुकडीचं नेतृत्त्व महिलांकडे देण्यावरून केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; 3 महिन्यात कमिशन स्थापन करण्याचेही आदेश

भारतात गूगलने 2015 मध्ये रेलटेल सोबत हा प्रकल्प सरु केला होती. पंरतु, ही सुविधा बंद करण्यात येणार आहे. गूगल चे वाइस प्रेसिडेन्ट यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहले आहे की, आम्ही निश्चित केलेल्या लक्ष्य 2018 मध्येच पूर्ण केले आहे. तसेच भारत हा असा एकमेव देश आहे, जिथे इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त आहे. यामुळे आम्ही 2020 पर्यंत हळूहळू रेल्वे स्थानकावरील फ्री वायफाय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.