Photo Credit- X

Google Maps Misleads Again: गुगल मॅपने पुन्हा एकदा चुकीचा मार्ग दाखवून कार चालकाला फसवल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब बरेलीहून (Bareilly)मथुरेला (Mathura)जात होते. गुगल मॅपने (Google Map) त्यांना महामार्गावरील बांधकाम सुरु असलेल्या रस्त्याचा मॅप दाखवला. मॅपवर दाखवल्याप्रमाणे कार चालकाने गाडी त्याच रस्त्याने नेली. त्यानंतर गाडी काही अंतरावर जाताच गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली (Acciden).

सुदैवाने एअरबॅग उघडल्याने कारमध्ये प्रवास करणाऱ्या कुटुंबाचा जीव वाचला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारमधील लोकांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. बरेलीचे रहिवासी विमलेश श्रीवास्तव आणि कुशव कारने मथुरेला जात होते. मथुरेला जाण्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. त्यांची गाडी मथुरा-बरेली महामार्गाजवळ पोहोचली.

मात्र, या ठिकाणी कोणतेही बोर्ड लावण्यात आले नव्हते. त्यामुळे चालकाने गाडी महामर्गावर नेली आणि ती कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. (Kerala: मुसळधार पावसात गुगल मॅप वापरणं पडलं महागात; केरळमध्ये कार नदीत पडल्याने 2 डॉक्टरांचा मृत्यू)

गूगलवर विसंभला त्याचा कार्यभार बुडाला

गुजरातमधील एका कुटुंबाची फसवणूक

गुजरातमधील एक कुटुंब पालनपूर येथून जिम कॉर्बेट पार्कला जात होते. हे कुटुंब गुगल मॅपच्या मदतीने सहलीला निघाले होते. मात्र गुगल मॅपमुळे त्यांचा रस्ता चुकला आणि कार चुकीच्या दिशेला गेली. नकाशातील चुकीच्या ठिकाणाहून भरकटलेली कार यूपीच्या बिजनौर जिल्ह्यात पोहोचली. गाडी नगीना येथील मजलेटा मार्केटमध्ये आल्यानंतर जल निगमच्या खोदलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात अडकली. यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.

गूगल मॅपवर भरवसा ठेवला, काय घडले पुढे?

केरळमध्ये कार नदीत पडून 2 डॉक्टरांचा मृत्यू

केरळमधील कोचीत गुगल मॅप चुकल्याने एक कार पेरियार नदीत पडली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या दोन डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. रस्ता माहित नसल्याने त्यांनी गुगल मॅप चालू केला होता. तेव्हा गोथुरुथमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे हवामान खराब होते आणि दृश्यमानता खूपच कमी होती. यामुळेच कारमधील प्रवाशांनी योग्य मार्गासाठी गुगल मॅपची मदत घेतली. त्यानंतर त्यांनी कार डाव्या बाजूने घेतली. मात्र चुकीमुळे ते थोडे पुढे गेले आणि त्यांची गाडी नदीत पडली.