Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता प्रवाशांना लवकरच रेल्वे स्थानकांवर (Railway Station) मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge) आणि बिल पेमेंट (Bill Payment) करता येणार आहे. खरेतर, 200 रेल्वे स्थानकांवरील प्रवासी लवकरच त्यांचे मोबाईल रिचार्ज करू शकतील, वीज बिल भरू शकतील, आधार आणि पॅनकार्डचे फार्म भरु शकतील. तसेच कर देखील भरु शकतात. RailTel ने एका निवेदनात म्हटले आहे की ही योजना CSC-SPV आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाच्या भागीदारीत सुरू करण्यात आली आहे. किऑस्क ग्रामस्तरीय उद्योजकांद्वारे चालवले जातील. किऑस्कचे नाव Railwire Sathi Kiosk असे ठेवण्यात आले आहे. Railwire हे RailTel च्या रिटेल ब्रॉडबँड सेवेचे ब्रँड नाव आहे.

भारतात सर्वप्रथम, उत्तर प्रदेशातील वाराणसी सिटी आणि प्रयागराज सिटी स्टेशनवर 'रेल्वे साथी CSC किओस्क' चाचणी आधारावर या प्रणालीचा उपयोग करण्यात आला आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. जवळपास 200 रेल्वे स्थानकांवर अशाच प्रकारचे किऑस्क टप्प्याटप्प्याने चालवले जातील, बहुतेक ग्रामीण भागात. यापैकी 44 किऑस्क दक्षिण मध्य रेल्वे विभागात, 20 ईशान्य सीमा रेल्वेमध्ये, 13 पूर्व मध्य रेल्वेमध्ये, 15 पश्चिम रेल्वेमध्ये, 25 उत्तर रेल्वेमध्ये, 12 पश्चिम मध्य रेल्वेमध्ये, 13 पूर्व कोस्ट रेल्वेमध्ये आणि 56 ईशान्य रेल्वेमध्ये झोनमध्ये असणार आहे. (हे ही वाचा इटलीहून अमृतसरला जाणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटच्या 125 प्रवाशांना कोरोनाची लागण, प्रवाशांचा आरोप - जबरदस्तीने पॉझिटिव्ह सांगितले जात आहे)

याचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळेल

RailTel चे CMD पुनीत चावला यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील लोकांना अनेक वेळा या सुविधाचा वापर करता येत नाही, तसेच इंटेरनेट वापरता येत नसल्यामुळे त्याना या अडचणीना जाव लागत. पण ग्रामीण भागातील लोकांन मदत करुन याचा पुरेपर वापर कसा करावा हे समजवले जाईल. ग्रामीण रेल्वे स्थानकांवर या आवश्यक डिजिटल सेवा लवकारत लवकर वितरीत करण्यात येतील.