प्रतिकात्मक फोटो | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतीय बाजारपेठेत सोन्याचा दर (Gold Rate) आज अचानक वाढून तब्बल 36,000 रुपयांपर्यंत पोहचला आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा दर वाढल्याने ही दरवाढ झाली आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या (All India Sarafa Association) मते, राजधानी दिल्लीमध्ये बुलियन दरांमध्ये 930 रुपयांनी वाढ होऊन सोने 35,800 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहचले आहे. 99.9% आणि 99.5% शुद्ध सोन्याचे भाव 930 रुपयांनी वाढून, प्रति 10 ग्रॅम साठी अनुक्रमे 35,630 आणि 35,800 रुपये इतके दर झाले आहेत.

चांदीच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. चांदीचा भाव 300 रुपयांनी वाढून 39,200 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) मते, ऑगस्टमध्ये सोन्याच्या भावात उच्चांकी दरवाढ होऊन, सोने 35,145 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचणार आहे.

(हेही वाचा: दोन दिवसांनतर सोने, चांदी दरामध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या कसे राहिले आजचे दर)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1, 420,80 डॉलर प्रति औंस आहे. तर चांदीची किंमत न्युयॉर्कमध्ये 1524 डॉलर प्रति औंस झाले आहेत. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी सोन्याच्या दराने अचानक उसळी मारली होती. हा भाव एका तोळ्यासाठी तब्बल 35,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर या दरामध्ये घट होऊन परत तो परत तो 32, 120 पर्यंत  खालीआला होता.