दोन दिवसांनतर सोने,  चांदी दरामध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या कसे राहिले आजचे दर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

मागच्या आठवड्यात सोन्याच्या दराने अचानक उसळी मारली होती. हा भाव एका तोळ्यासाठी तब्बल 35,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर गेले दोन दिवस या दरामध्ये घट झालेली दिसून येत होती. मात्र अचानक सोन्याचा भाव पुन्हा वाढला आहे. आज हा दर 260 रुपयांनी वाढून 34,380 प्रति तोळ्यापर्यंत पोहचला होता. सोन्यासोबतच चांदीच्या दरामध्येही वाढ झाली होती. चांदीचा दर किलोमागे 150 रुपयांनी वाढला असून, दिल्लीत चांदीचा दर बुधवारी 38,650 रुपये होता.

सोन्याने पस्तीशी गाठल्यानंतर परत तो 32, 120 पर्यंत आला होता. मात्र या दरम्यान सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने हा दर अचानक वाढला. न्यूयॉर्कमध्ये डॉलरच्या दरानुसार सोन्यात मूल्यवाढ झाली असून त्याचा भाव 1,425.95 प्रति औन्स तर चांदीचा दर 15.31  प्रति औन्स इतका झाला. याचा परिणाम भारतीय सोने बाजारावर झाला. (हेही वाचा: ब्रामध्ये 47 लाख रुपयांचं सोनं; महिलेला चेन्नई विमानतळावर मुद्देमालासह अटक)

तसेच गोल्ड बाँड्सच्या किंमतीने नीचांक गाठल्याने त्याची मागणी वाढली. याचाही परिणाम सोन्याच्या भाववाढीवर झाला असल्याचे सांगितले जात आहे.

सोने - Rs 34,375 प्रति  10 ग्रॅम

चांदी - Rs 37,348 किलो