सध्या देशामध्ये लॉकडाउनचा पाचवा टप्पा सुरु असून यावेळी सराफ बाजार बंद असले तरी सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये काहीसा चढउतार पाहायला मिळत आहे. आज सोन्या- चांदीच्या किमंतीमध्ये (Gold-Silver Price Today) काहीसा बदल पाहायला मिळाले आहे. आज देशभरातील सराफा बाजारात सोन्याचे ताजे दर 46 हजार 483 रुपये प्रति तोळा आहेत. तर, आज सकाळी वायदा बाजारात चांदीच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात सोमवारपेक्षा 4 रुपयांनी वाढ झाली. तर, 23 कॅरेट सोन्यातही 4 रुपयांनी, 22 आणि 18 कॅरेट 3 रुपयांनी वाढले आहे. एमसीएक्सवर 3 जुलै 2020च्या चांदीची किंतम 0.26 टक्के म्हणजे 125 रुपयांनी घसरून 48 हजार 060 रुपये प्रति किलो झाली आहे.
मंगळवारी सकाळी जागतिक बाजारपेठेतही सोन्याचांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदे बाजारात दर 0.30 टक्क्यांनी किंवा 5.10 डॉलर्स प्रति औंसच्या खाली घसरले. त्याचबरोबर सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत 0.18 टक्क्यांनी किंवा $ 3.14 डॉलरने घसरत 1,695.39 डॉलर प्रति औंस झाली. हे देखील वाचा- Mega Millions Lottery: येत्या आठवड्यात कोणीही एक भारतीय जिंकू शकतो 30.9 बिलियनची मेगा लॉटरी; सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे करा क्लिक
शुद्ध सोने कसे ओळखले जाते?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.