
Ghaziabad Crime News: गाझियाबाद मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ७ वर्षाच्या भाचीवर २७ वर्षाच्या तरुणाने विनयभंग केला आणि तीचा गळा दाबून खून देखील केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीला या प्रकरणात विनयभंगाच्या आरोपाखाली गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने फिल्मी स्टाईल पोलिस कर्मचाऱ्यांचे पिस्तुल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला. या नंतर घटनास्थळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. शनिवारी या घटनेची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहिती नुसार इम्रान असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी एमएमजी रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर, आरोपीला परत आणताना, त्याने त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात गोळीबार केला,आरोपी घटनास्थळावरून पळून जाताना गोळीबार झाला. तेवढ्यात पोलिसांकडून एक गोळी आरोपीच्या पायाला लागली. यामुळे तो जखमी झाला. जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला शासकिय रुग्णालयात दाखल केले.
गाझियाबाद पोलिसांनी आरोपीवर पोलिसांच्या पिस्तुल हिसकावून फरार होण्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. ७ वर्षाच्या मुलीचा विनयभंग आणि तीच्या हत्ये संदर्भात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.