Dog | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Ghaziabad Animal Cruelty: गाझियाबाद येथील खेडा गावात एक संतापजनक घटना घडली आहे. घरासमोर चालल्यामुळे दोन पाळीव कुत्र्यांवर शेजारच्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघे पाळीव कुत्रे जखमी झाले आहे. दोन बहिणींनी कुत्र्यांना हल्ल्यापासून वाचवले आहे. या प्रकरणी शेजारच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. क्षुल्लक वादातून परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. (हेही वाचा- घटस्फोट मागणाऱ्या पत्नीवर पतीने फेकलं ॲसिड; महिलेसह 12 वर्षांचा मुलगा जखमी, आरोपीला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी कुत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका कुत्र्याला २० टाके तर दुसऱ्या कुत्र्याला १८ टाके पडले आहे. पाळीव कुत्र्याच्या मालकांनी या प्रकरणी तक्रार नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. ही घटना २४ जुलै रोजी सुभाष नगर परिसरात घडली आहे. शेजारच्या घरासमोर  कुत्रे फिरते होते त्यामुळे त्यांनी घरी उपस्थित असलेल्या दोन बहिणींना शिवीगाळ केली आणि त्यांनतर मारण्यासाठी चाकू आणला. या घटनेनंतर दोन्ही पाळीव कुत्रे संतापले आणि दोन्हीमध्ये झटापट झाली.

शेजारच्यांनी चाकूने वार करत दोन्ही कुत्र्यांना जखमी केले. ही घटना संध्याकाळच्या वेळी घडली ज्यावेळीस घरातले बाहेर कामासाठी गेले होते. मालक कामावरून घरी परतल्यानंतर दोन्ही कुत्रे जखमी अवस्थेत होते. त्यांना रुग्णायलयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.