Kushinagar: कुशीनगर जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांच्या पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत, बनावट नोटांच्या व्यवसायात सहभागी असलेल्या 10 जणांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. असे कुशीनगरचे पोलिस अधीक्षक (एसपी) संतोष कुमार मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले, तमकुहिराज, सेवासुजन, सायबर यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी या टोळीला जेरबंद केले, अशी माहिती त्यांनी दिली. अवैध देशी बनावटीची शस्त्रे, काडतुसे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. हे देखील वाचा: Delhi Shocker: नवीन फोनची पार्टी न दिल्यामुळे मित्रांनी केला 16 वर्षीय तरुणाचा खून
मोहम्मद रफिक खान उर्फ बबलू खान, नौशाद खान, मोहम्मद रफी अन्सारी, औरंगजेब उर्फ लादेन, शेख जमालुद्दीन, नियाझुद्दीन उर्फ मुन्ना, रेहान खान उर्फ सद्दाम, हसिम खान, सेराज हशमती आणि परवेझ इलाही (सर्व) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सगळे कुशीनगरचे रहिवासी आहेत.
एसपी म्हणाले की, आरोपींच्या ताब्यात 5 लाख 62 हजार रुपयांच्या बनावट नोटा, 1 लाख 10 हजार रुपयांच्या खऱ्या भारतीय नोटा, 3 हजार रुपयांच्या नेपाळी नोटा, 315 बोअरची 10 अवैध पिस्तुल, 30 काडतुसे, 12 गोले, चार सुतळी देशी बॉम्ब, गुन्ह्यात वापरलेले 13 मोबाईल, 26 बनावट सिमकार्ड, 10 बनावट आधार कार्ड, 10 एटीएम कार्ड आणि आठ लॅपटॉप आणि दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. वसुली व अटकेच्या आधारे आरोपींविरुद्ध तमकुहीराज पोलीस ठाण्यात बनावट नोटा खरेदी-विक्री व शस्त्रास्त्र कायदा व स्फोटक द्रव्ये कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.