कोरोना व्हायरस संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. अशा नाजूक काळात जगभरातील देशांसमोर आर्थिक मंदीचे आव्हान उभे राहिले आहे. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला मार्गावर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund जोरदार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना अधिक गती देऊन रुळावर आणण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांची मदत घेतली जाणार आहे. रघुराम राजन यांची IMF चे सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.
रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून सलग तीन वर्षे कारभार पाहिला आहे. ते सध्या शिकागो विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. आरबीआय गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांचा कार्यकाळ सप्टेंबर 2016 मध्ये संपला. त्यानंतर उर्जित पटेल यांनी आरबीआयची सूत्रे गव्हर्नर म्हणून हाती घेतली. उर्जित पटेल यांच्या कार्यकाळातच केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा, Coronavirus: रघुराम राजन म्हणतात देशावर इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीचे सावट)
ट्विट
Former Reserve Bank of India Governor #RaghuramRajan has been named as a member of the International Monetary Fund Managing Director's External Advisory Group. pic.twitter.com/8eevwawubR
— IANS Tweets (@ians_india) April 11, 2020
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले की, रघुराम राजन आणि इतर 11 अर्थतज्ज्ञांना नाणेनिदीचे बाह्य सल्लागार समूहाचे सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. IMF च्या या समूहात सिंगापूरचे जेष्ठ मंत्री तारमण षणमुगरत्नम, मैसचुएट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी प्रफेसर क्रिस्टीन फोर्ब्स, ऑस्ट्रेलिया चे माजी पंतप्रधान केविन रुड, संयुक्त राष्ट्र माजी उप महासचिव लॉर्ड मार्क मलोक ब्राउन यांचा समावेश आहे.
आयएमएफ प्रमुखांना हे सल्लागार मंडळ कोरोना व्हायरस संकटातून जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय जगभरातील अर्थव्यवस्थेत होत असलेला बदल, नैतिक मुद्दे यांबद्दल हे मंडळ मार्दर्शन करेन. विविध देशांतील आर्थव्यवस्था सावरावी. हे गाडे लवकर रुळावर यावे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु आहेत.