Forbes List of Richest Indians Celebrities 2018: यंदा 'या' सेलिब्रेटींनी केली बक्कळ कमाई; Salman Khan अव्वल स्थानी
सलमान खान-दीपिका पदुकोण-विराट कोहली (Photo Credit: File Photo)

Forbes List of Richest Indians Celebrities 2018: फोर्ब्स इंडियाने (Forbes India) 2018 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडच्या दबंग खान सलमान खानने (Salman Khan) बाजी मारली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये सलमान खानने विराट कोहलीलाही (Virat Kohli) मागे टाकत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. अनेक ब्लॉकबास्टर सिनेमे, विविध ब्रँडच्या जाहिराती आणि टेलिव्हीजन शोज यातून 52 वर्षांच्या सुलतानने बक्कळ कमाई केली आहे. फोर्ब्सनुसार, सलमानने वर्षभरात एकूण 253.25 कोटींची कमाई केली आहे.

सर्वाधिक कमाईच्या यादीत सलमान खाननंतर 228.09 कोटींची कमाई करत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. यादीत तिसऱ्या स्थानी आहे खिलाडी कुमार अक्षय कुमार. (Akshay Kumar) याची वर्षभराची कमाई आहे 185 कोटी रुपये. तर नववधू दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) 112.8 कोटी कमाईसह या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. त्यानंतर पाचव्या स्थानी आहे टीम इंडियाचा कूल कॅप्टन महेंद्र सिंग धोनी. (Mahendra Singh Dhoni) 101.77 कोटी इतकी धोनीची वर्षभराची कमाई आहे. टॉप 5 मध्ये असणारी दीपिका पदुकोण ही एकमेव महिला सेलिब्रेटी आहे.

यांच्या नंतर आमिर खान, अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, सचिन तेंडूलकर आणि अजय देवगण यांचा टॉप 10 मध्ये समावेश आहे. तर यंदा या यादीतून किंग खान शाहरुख खान आणि देसी गर्ल प्रियंका चोप्रा यांची गच्छंती झाली आहे. हे ही वाचा:  सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 यूट्यूब चॅनल्स 

फोर्ब्सनुसार, या यादीत पहिल्या 100 हून अधिक सेलिब्रेटींनी 3,140.25 कोटी रुपये कमावले आहेत. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 17% अधिक आहे. गेल्यावर्षी ही कमाई 2,683 कोटी रुपये इतकी होती. यंदा फोर्ब्सच्या या यादीत केवळ 18 महिला सेलिब्रेटी आहेत. त्यात अलिआ भट्ट, अनुष्का शर्मा, तापसी पन्नू, नयनतारा आणि पी. व्ही. सिंधू यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी महिलांची संख्या 21 होती.