Fire | Pixabay.com

Fire Broke Out In Firecracker Market In Mathura: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरा (Mathura) जिल्ह्यातील राय कसबा येथील एका तात्पुरत्या फटाका मार्केटला दिवाळीच्या (Diwali 2023) दिवशी दुपारी भीषण आग (Fire) लागली. या अपघातात 12 हून अधिक जण गंभीर भाजले आहेत. सर्वांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. राजा कसबा येथील माँट रोडवर असलेल्या गोपाळ बागेत फटाक्यांची 24 तात्पुरती दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. दिवाळीसाठी लोक दुपारी येथे खरेदीसाठी आले होते.

दरम्यान, फटाका मार्केटमध्ये आग लागली. या दुर्घटनेत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. लोक इकडे तिकडे धावू लागले. या घटनेत 12 हून अधिक जण जखमी झाले. (हेही वाचा - Diwali 2023 Celebration: भारतीय जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशनसाठी PM Narendra Modi पोहचले हिमाचल प्रदेशातील Lepcha गावात!)

मुख्य अग्निशमन अधिकारी नरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, आगीच्या कारणाचा शोध सुरू आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी चार जणांना आग्रा येथे रेफर करण्यात आले आहे.