Father Kills Daughter: आई, भावाच्या आठवणीत रडणाऱ्या 4 वर्षाच्या चिमुकलीची निर्दयी बापाकडून हत्या; गाझियाबाद येथील घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

Ghaziabad Man Killed His Four-Year-Old Daughter: आई आणि भावाच्या आठवणीत रडणाऱ्या एका चिमुकलीची तिच्या जन्मदात्या पित्यानेच हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना गाझियाबाद (Ghaziabad) साहिबाबामधील खोडाच्या नेहरू गार्डन भागात गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत ही घराबाहेर पडलेल्या आई आणि भावाच्या आठवणीत रडत होती. परंतु, तिच्या रडण्याला वैतागून आरोपीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वासुदेव गुप्ता असे हत्या करणाऱ्या पित्याचे नाव आहे. वासुदेव हा खोडाच्या नेहरू गार्डन भागात राहतो. तो मूळचा सुलतानपूरचा असून टप्पो चालवतो. तर, त्याची पत्नी एका स्पा सेंटरमध्ये कामाला आहे. त्याला एक मुलगा (वय,3) आणि एक मुलगी आदिती (वय, 4) आहे. मात्र, गेल्या वीस दिवसांपूर्वी त्याची पत्नी आपल्या मुलाला घेऊन घर सोडून गेली होती. परंतु, तिने आदितीला वासुदेवजवळच ठेवले होते. गुरुवारी दुपारी, आदिती आपल्या आई आणि भावाच्या आठवणीत रडत होती. त्यावेळी वासुदेवने तिला अनेकदा गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे रडणे न थांबल्यामुळे वासुदेवने रागाच्या भरात तिचा गळा आवळला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला, अशी माहिती एका मराठी वेबसाईटने दिली आहे. हे देखील वाचा- Mathura Boy Kills Father: युट्यूबवर क्राईम पेट्रोलचे व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलाने केली वडिलांची हत्या; उत्तर प्रदेशातील मथुरा येथील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला नोएडा सेक्टर 11 मधून अटक करण्यात आली. दरम्यान, टेम्पोची तपासणी केली असता पोलिसांना मुलीचा मृतदेह त्यात सापडला. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. तसेच पोलीस मुलीच्या आईचाही शोध घेत असल्याचे समजत आहे.