UP Shocker: 500 रुपये न दिल्याने वडिलांची निर्घृण हत्या, युपीतील धक्कादायक घटना
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

UP Shocker: उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका तरुणाने वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेअंतर्गत आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावले आहे. चौकशीतून समोर आले की, आरोपी मुलाने अवघ्या 500 रुपयांसाठी वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. वडिल आणि मुलगा दोघेंही वीठबिकारीचे काम करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात एका  25 वर्षीय तरुणाने वडिलांनी 500 रुपये देण्यास नकार दिल्याने वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. घटनेच्या दिवशी वडिलांना ठेकेदाराला फोन करत 500 रुपये देण्याची विनंती केली, आपला मुलगा 500 रुपयांसाठी भांडत असल्याचे ठेकेदाराला सांगितले पोलिसांनी ठेकेदार यांच्या फोनची रेकॉर्डिंग तपासल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हे प्रकरण उंचाहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेही गावचे आहे. येथे राहणारा त्रिलोकी यादव असं मृत व्यक्तीचे नाव आहे. संजय यादव असं आरोपी मुलाचे नाव आहे.  मुलालाही दारूचे व्यसन असल्यामुळे दोघांचे दररोज भांडण व्हायचे. 1 जानेवारीला सांयकाळी मुलाने 500 रुपये मागितले ते देण्यास वडिलांनी नकार दिला. तू स्वत: कमावतोस, मग मी पैसे का देऊ, असा वाद घालत एकमेकांना शिवीगाळ केली.

मुलाने याचा राग मनात धरत वडिलांची निर्घृण हत्या केली. लाकडी फळीने त्याच्या डोक्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केला. यात त्याचा मृत्यू झाला आणि मृतदेह घराबाहेर फेकून तो परार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी फरार मुलाला शोधण्यासाठी पथक नेमले. पोलिसांनी आरोपी मुलाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वडिलांच्या खूनाची कबुली दिली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.