Accident Video: उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर महिंद्रा कारची भरधाव वेगात असलेल्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात महामार्गावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले असून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.( हेही वाचा- कैमूर येथे भरधाव कारची दुचाकीसह ट्रकला धडक; अपघातात 9 जण जागीच ठार)
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात 25 फेब्रुवारी रोजी झाला. पूर्वांचल एक्स्प्रेस हायवेवरून जाणाऱ्या एसयूव्ही कारचा अपघात झाला आहे. अनियंत्रित कारची भरधाव ट्रॅकला धडक लागल्याचे व्हिडिओ दिसत आहे. एसयूव्हीचा टायर फुटल्याने हा अपघात घडून आला आहे, चालकाने वाहानावरिल नियत्रंण सुटले आणि पुढे जात असलेल्या ट्रकला धडक दिली. धडक दिल्यानंतर कार पुढे जाऊ पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. स्थानिक पोलिस ठाण्यातील एक पथक अपघातस्थळी आले. जखमी प्रवाशांना दर्शन नगर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कारचे अक्षरशा: चेंदामेंदा झाला आहे. कारमधील प्रवाशी हे काशी विश्वनाथचे दर्शन घेण्यासाठी आणि कुटुंबातील लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी वाराणसीला जात होते. अपघातात मृत झालेल्या महिलांची ओळख पटली आहे. एकाच घरातील सासू आणि सून यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळला आहे.