Bihar Accident News: कैमूर येथे भरधाव कारची दुचाकीसह ट्रकला धडक; अपघातात 9 जण जागीच ठार,
बिहार (Bihar)राज्याच्या कैमुर जिल्ह्यात काल रविवारी २५ फेब्रुवारी रोजी भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Bihar Accident News: बिहार (Bihar)राज्याच्या कैमुर जिल्ह्यात काल रविवारी 25 फेब्रुवारी रोजी भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्कॉर्पिओने समोरून जात असलेल्या ट्रकवर आदळली. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. यात अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातनंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. (हेही वाचा- पोलिस भरतीच्या सरावासाठी जात असताना रस्ते अपघात,)
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओतील प्रवाशी सासारामहून वाराणसीच्या दिशेने जात होती. या कारमध्ये ८ प्रवाशी प्रवास करत होते. देवकाळी गावाजवळ येताच कार अनियंत्रित झाली आणि पुढे जाऊन दुचाकीला आणि ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले. रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. पोलिसांनी अपघतात अडकलेल्या मृतांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मृतांची ओळख अद्याप पटली नसून मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
कारने दुचाकीला धडक दिली त्यानंतक विरुध्द दिशेने येणाऱ्या कंटनेरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा संपुर्ण चक्काचूर झाला आहे. ट्रकचा देखील समोरील भागाचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतुक कोंडी सुरळीत केली. पोलिसांच्या मदतीने मृतांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिस घटनेची चौकशी करत आहे. मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा पोलिसांचा प्रयत्न चालू आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 26, 2024 07:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

