Explosion In Illegal Firecracker Factory At Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अमलापुरम शहरातील रवुलाचेरुवू (Ravulacheruvu) येथे सोमवारी एका निवासी इमारतीत झालेल्या स्फोटात (Explosion) किमान 14 जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील (Ambedkar Konaseema District) एका निवासी इमारतीत सोमवारी स्फोट झाला. या कारखान्यात बेकायदेशीरपणे फटाके तयार केले जात होते.
या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, या दुर्घटनेत दुमजली इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. बी.आर आंबेडकर कोनासीमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बी. कृष्णा राव यांनी सांगितले की, 'रावुलाचेरुवू, अमलापुरम शहरातील एका निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे फटाके तयार केले जात असताना स्फोट झाला. या घटनेत 14 लोक जखमी झाले. जखमींना अमलापुरम एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेत दोन मजली इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.' (हेही वाचा - Kolkata Explosion: कोलकात्यातील एसएन बॅनर्जी रोडवर स्फोट; एक जण जखमी, पोलिस-फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू)
दरम्यान, स्थानिकांनी जखमींना अमलापुरम एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यातील एका जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अमलापुरम टाउन पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी स्फोटाचा तपास सुरू केला. स्थानिक आमदार अयथाबत्तुला आनंदा राव यांनी घटनास्थळी धाव घेत स्फोट झालेल्या परिसराची पाहणी केली. तथापी, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. (हेही वाचा -Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी)
गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका औषध कारखान्यात बुधवारी झालेल्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत 40 जण जखमी झाले होते. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी युनिटमध्ये अडकलेल्या 13 जणांना वाचवण्यात यश आले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अच्युतापुरम फार्मा कंपनी दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.