Kolkata Bomb Blast: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता (Kolkata) येथील एस.एन. बॅनर्जी रोड (SN Banerjee Road) वरील एका गोणीत स्फोट (Explosion) झाला. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक (Bomb Squad) दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास तलतला पोलिस स्टेशनला ब्लोचमन स्ट्रीट आणि एसएन बॅनर्जी रोडच्या जंक्शनवर स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत कचरा वेचणाऱ्या व्यक्ती जखमी झाला आहे.
जखमी व्यक्तीला एनआरएसमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या उजव्या मनगटावर दुखापत झाली आहे. ब्लॉचमन स्ट्रीटच्या प्रवेशद्वारावर प्लास्टिकची गोणी पडून होती. यामध्ये स्फोट झाला. सुरक्षा टेपने परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून घटनास्थळी बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले. (हेही वाचा -Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी)
कोलकात्यातील एसएन बॅनर्जी रोडवर स्फोट, पहा घटनास्थळावरील दृश्य -
#WATCH | West Bengal: Information was received at around 13.45 hrs that at the x-ing of Blochmann St and S N Banerjee Rd an incident of blast took place and one person/rag picker was injured. Accordingly, OC Taltala went there and learnt that injured was removed to NRS & has… pic.twitter.com/aRI3DRTQQF
— ANI (@ANI) September 14, 2024
प्राप्त माहितीनुसार, घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून स्फोट झालेल्या परिसराची तपासणी करण्यात येत आहे. स्फोटानंतर पोलिसांनी एसएन बॅनर्जी रोडवरील वाहतुकीस प्रतिबंद केला आहे. (हेही वाचा -Chemical Factory Blast in Roha: रोहा येथील केमिकल फॅक्टरीत स्फोट, तीन मजुरांचा जणांचा मृत्यू, ३ जखमी)
तथापी, रुग्णालयात जखमी झालेल्या व्यक्तीने आपले नाव बापी दास (वय, 58) असे सांगितले आहे. त्याच्या वडिलांचे नाव लेफ्टनंट तारपद दास आहे. तो इच्छापूरचा रहिवासी असून त्याचा कोणताही व्यवसाय नाही. अलीकडे तो एसएन बॅनर्जी रोडच्या फूटपाथवर राहत होता. स्फोट झाला त्यावेळी तो त्याच परिसरात होता.