Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या घटनेत मृतांचा आकडा 5 वर गेला आहे. तर 5 जण जखमी आहेत. नागपूरमधील चारमुंडी कारखान्यात हा स्फोट झाला. स्फोट एकच्या सुमारास झाला. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस सध्या घटनेचा तपास करत आहेत. नागपूरमध्ये याआधीही स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला होता. दरम्यान, काल बुधवारी डोंबिवलीमध्ये एका कंपनीत स्फोट झाला होता. त्यानंतर आता नागपूरमध्ये देखील अशी घटना घडली आहे. (हेही वाचा:Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसी मध्ये महिन्याभरात दुसर्यांदा भीषण स्फोट झाल्याने आग (Watch Video))
पोस्ट पाहा-
#WATCH | Nagpur Police Commissioner Ravinder Singhal says, "About 4-5 people died in this incident, including 4 women. Our investigation is ongoing. Our team, crime branch and senior officers are present on the spot, action is being taken." https://t.co/YKoVAfmaBn pic.twitter.com/bnaC2kYvao
— ANI (@ANI) June 13, 2024
धामना गावाजवळील स्फोटक कारखान्यात ही घटना घडली. सध्या कारखान्याचे व्यवस्थापक आणि मालक फरार आहेत. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तिथे आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दुर्घटनेनतंर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्फोटाची माहिती मिळताच कामगारांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांची गर्दी पहायला मिळाली. माजी आमदार अनिल देशमुख घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरात स्फोटांचे मोठे आवाज येउ लागल्याने काहीराळ तेथे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.