उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने कुलदीप सिंह सेनगर (Kuldeep Sengar) याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवलं होतं. कुलदीप सिंह सेनगर हे भाजपचे आमदार होते. मात्र, त्यांना भाजपने पक्षातून निलंबित केलं होतं.
कुलदीप सिंह सेनगर याला न्यायालयाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. सेनगर यांना 2017 मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने दोषी ठरवलं होतं. न्यायालयाने याप्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर, तत्कालिन माखी ठाण्याचे सबइन्स्पेक्टर कामता प्रसाद, तत्कालिन माखी ठाणाचे एसएचओ अशो सिंह भदौरिया, विनय शर्मा, बीरेंद्र सिंह उर्फ बऊवा सिंह, शशी प्रताप सिंह उर्फ सुमन सिंह, जयदीप सिंह उर्फ अतुल सिंह यांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. (हेही वाचा - Rajya Sabha Election 2020: काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या नावाची घोषणा)
उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदाराने बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झाला होता. उन्नाव इथे जून 2018 मध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. पीडितेने कुलदीप सिंग सेंगर याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. परंतु, पोलिसांनी या प्रकरणी सर्व पुरावे असतानाही कुलदीप सेंगर याला अटक करण्यास टाळाटाळ केली गेली.
सेनगर याने पीडितेच्या वडिलांना क्रूरपणे मारहाण केली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. 2017 मध्ये सेनगर याला उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. कुलदीप सिंह याचा भाऊ अतुल याने काही सहकाऱ्यांच्या मदतीने पीडित तरुणीच्या वडिलांना मारहाण केली होती. आज या प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.