Rajya Sabha Election 2020: काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या नावाची घोषणा
Rajiv Satav | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने राज्यसभा निवडणूक 2020 (Rajya Sabha Election 2020) साठी आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 9 जणांच्या नावांचा समावेश आहे. हे नऊ जण वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यासाठी काँग्रेसने राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. राजीव सातव हे काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर जाऊ शकतील. मात्र, ही शक्यता प्रत्यक्षात येण्यासाठी प्रत्यक्षात मतांजी बेरीज जुळणे महत्त्वाचे असणार आहे.

काँग्रेसच्या उमेदवार यादीमध्ये छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यातून प्रत्येकी दोन तर झारखंड, महाराष्ट्र, मेघालय या तिन राज्यांमधून प्रत्येकी एका उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्यातून केटीएस तुलसी आणि फुलो देवी नेताम, झारखंड येथून शेहजाद अन्वर, मध्य प्रदेश दिग्विजय सिंह आणि पूजा सिंह भारीया, महाराष्ट्रातून राजीव सातव, मेघालय केनेडी कर्नेलीअस खैय्यीम आणि राजस्थानमधून के सी वेणूगोपाल व नीरज दंगी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2020: राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांना महाराष्ट्रातून राज्यसभेचं तिकीट?)

एएनआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रातून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोसले, भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने आपल्या कोट्यातून प्रियंका चतुर्वेदी यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्ष शरद पवार आणि फैजिया खान यांना उमेदवारी दिली आहे.