Chhattisgarh's Bemetara Accident: भरधाव ट्रकची मिनी बसला धडक,आठ जण ठार, 23 जखमी
Chhatishgarh Accident PC TWITTER

 Chhattisgarh's Bemetara Accident:  छत्तीसगडच्या बेमेटारा जिल्ह्यात काल रात्री भीषण अपघात झाला आहे. एका मालवाहू ट्रकची धडक मिनी बसला बसून हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. यात पाच महिला आणि तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आणि 23 जण जखमी झाले,अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती.  (हेही वाचा- बाल्कनीच्या छतावर पडलेल्या बाळाला जीवदान, काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा काथिया गावाजवळ हा अपघात झाला. एक कुटुंब कार्यक्रमातून घरी परतत होते त्यावेळीस ही घटना घडली. मिनी बसमधून सह कुटुंब प्रवास करत होते. भरधाव वेगात असलेलं ट्रक अनियंत्रित होऊन मिनी बसला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यात दोन्ही वाहने चक्काचूर झाले आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाला. मिनी बसमधील पाच महिला आणि तीन लहान मुलांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.

तात्काळ पोलिस अपघात स्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना अडकलेल्या वाहनांतून बाहेर काढले. रुग्णावाहिकेच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिनी बसमधील प्रवाशी मूळचे पाथरा गावचे रहिवासी होते. ते तिरय्या गावात एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. भुरी निषाद (50), नीरा साहू (55), गीता साहू (60), अग्नि साहू (60), खुशबू साहू (39), मधु साहू (5), रिकेश निषाद (6) आणि ट्विंकल निषाद (6) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.