Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे मध्ये नोकरीची संधी; 21 नोव्हेंबर पर्यंत rrc-wr.com वर करा ऑनलाईन अर्ज
Representational Image |(Photo Credits: PTI)

नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी आता पश्चिम रेल्वे (Western Railway) मध्ये नोकरीची संधी आहे. मुंबई मध्ये पश्चिम रेल्वेत 80 जागांसाठी नोकरभरती होणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ स्टेनोग्राफर, कनिष्ठ अनुवादक /हिंदी, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती होणार आहे. दरम्यान या साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इच्छूक उमेदवारांना याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता 21 नोव्हेंबर पर्यंतचा वेळ आहे. GDCE कोट्याच्या अंतर्गत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पश्चिम रेल्वे मध्ये पदभरतीसाठी उमेदवारांची निवड एका परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे. पहिली फेरी पार केलेल्यांना नंतर टेक्निकल आणि स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून मेडिकल टेस्ट होईल आणि उमेदवार निवडले जाणार आहे. नक्की वाचा: Central Railway Recruitment: मध्य रेल्वे नागपूर येथे नोकरीची संधी; परीक्षा न देता होणार भरती, जाणून घ्या सविस्तर.

ऑनलाईन अर्ज कसा कराल?

www.rrc-wr.com या वेबसाईटला भेट द्या.

“ONLINE/E-APPPLICATION” या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर “New Registration” वर क्लिक करा.

पुढे तुम्हांला तुमचं नाव, जन्मतारिख, इमेल यासारखी आवश्यक माहिती भरा.

इमेल वर आलेल्या रजिस्ट्रेशन नंबर, पासावर्डने लॉगिंग करा.

तुम्हांला दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करा.

तुमचा फोटो स्कॅन करून अपलोड करा.

 

प्रत्येक पदानुसार पात्रता निकष वेगवेगळे आहेत. पण किमान 10वी पास, आयटीआय केलेल्यांना ते तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्यांना या नोकरभरती मध्ये संधी मिळणार आहे. इथे वाचा सविस्तर नोटिफिकेशन.