Central Railway Recruitment: मध्य रेल्वे नागपूर येथे नोकरीची संधी; परीक्षा न देता होणार भरती, जाणून घ्या सविस्तर
Representational Image |(Photo Credits: PTI)

भारतीय मध्य रेल्वे नागपूर (Central Railway Nagpur Division) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. GDMO, फिजिशियन, बालरोगतज्ञ या पदांसाठी ही भरती असणार असून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुलाखती होणार आहेत. दरम्यान, भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, पगार इत्यादी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया... (IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिसच्या पदावर नोकर भरती, जाणून घ्या अधिक)

पदं:

1. GDMO (GDMO)

2. फिजिशियन (Physician)

3. बालरोगतज्ञ (Pediatrician)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

GDMO:

उमेदवार MBBS असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित डिप्लोमा, इंटर्नशिप केलेली असणं आवश्यक आहे. कामाचा अनुभव असणं गरजेचे असून सेवानिवृत्त उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतील.

फिजिशियन (Physician):

उमेदवार MBBS असणं आवश्यक आहे. संबंधित डिप्लोमा, इंटर्नशिप केलेली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना प्रॅक्टिसचा तीन वर्षांचा अनुभव गरजेचं असून सेवानिवृत्त उमेदवार देखील अर्ज करु शकतील.

बालरोगतज्ञ (Pediatrician):

MBBS असणं आवश्यक आहे. संबंधित डिप्लोमा, इंटर्नशिप केलेली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना प्रॅक्टिसचा तीन वर्षांचा अनुभव गरजेचं असून सेवानिवृत्त उमेदवार देखील अर्ज करु शकतील.

पगार:

GDMO (GDMO) - 75,000/- रुपये प्रति महिना

फिजिशियन (Physician) - 95,000/- रुपये प्रति महिना

बालरोगतज्ञ (Pediatrician) - 95,000/- रुपये प्रति महिना

मुलाखतीची तारीख व पत्ता:

28 ऑक्टोबर 2021 रोजी या भरतीसाठी मुलाखती होणार असून त्यासाठी विभागीय रेल्वे रुग्णालय सभागृह किंग्सवे, मध्य रेल्वे, नागपूर येथे भेट द्यावी लागेल.

या संदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तर पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://cr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.