Viral Video in Yogapatti School | PC: Twitter

बिहारमधील एका शाळेतील एका शिक्षिकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत ही शिक्षिका महाराणीसारखी खुर्चीवरती झोपली आहे आणि एक विद्यार्थिनी चक्क तिला पंख्याने वारा घालत आहे. या व्हिडिओची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र हा व्हिडिओ बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील (Bettiah District of Bihar ) योगापट्टी (Yogapatti ) येथील असल्याचे सांगितले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, या व्हिडिओने बिहारमधील शिक्षणव्यवस्थेची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे.

बिहारमध्ये सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांचे सरकार शिक्षण क्षेत्रासाठी दमदार काम करत असल्याचा दावा नेहमीच करण्यात येतो. शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारावा यासाठी अनेक योजनाही नेहमीच राबवल्या जातात असे सरकार समर्थकांकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र अनेकविद्यार्थी शिक्षणापासून वंचितच राहतात. ज्यांना शाळेची पायरी चढायला मिळते त्यांच्या वाट्याला असे काही शिक्षक येतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होतेच. शिवाय अमानवतेचा क्रूर चेहराही समोर येतो. (हेही वाचा, Desi Jugaad Video: वाफ घेण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल, प्रेशर कुकरला बनवले स्टिमर)

बेतिया जिल्ह्यातील असल्याचा दावा केल्या जाणाऱ्या या व्हिडिओत पाहायला मिळते की , एक शिक्षिका वर्गात खुर्चीवर आरामात झोपल्या (बसल्या) आहेत. एका विद्यार्थीनीला त्यांनी एखाद्या दासीप्रमाणे उभी केली आहे. ही विद्यार्थीनी या शिक्षिकेला एका पंख्याद्वारे वारा घालत आहे. वर्गात इतरही काही विद्यार्थी बसल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडिओ एका जिल्हा परिषद शाळेचा असल्याचेही सांगितले जात आहे. कोणीतरी या प्रकाराचा गुपचुप व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगितले जात आहे.

ट्विट

सांगितले जात आहे की, शनिवारी शाळा सुरु होती. शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवायला वर्गात गेल्या होत्या. मात्र, विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी त्यांनी वर्गात झोपनेच पसंत केले. दुसऱ्या बाजूला त्यांनी एका विद्यार्थिनीला बोलावून तिला पंख्याने वारा घालण्यास सांगितले. दरम्यान, शाळेच्या मुख्याद्यापकाचे म्हणने असे की, संबंधित शिक्षिका आजारी होती. त्यामुळे शिकवताना तिचे डोके काहीसे खाली घसरल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्या खुर्चीवर झोपल्यात असे वाटते. विद्यार्थ्यांनीच शिक्षिकेला खुर्चीवर बसवले होते.