राज्यात दहावी आणि बारावीच्या ऑनलाइन परीक्षेच्या मागणीसाठी मुंबई, औरंगाबाद, नागपूर, अकोला, पूणे आणि उस्मानाबादमध्ये विद्यार्थी (Maharashtra Student Protest) रस्त्यावर उतरले. मुंबईतील धारावी येथे मोठ्या संख्येने शाळकरी मुले जमली होती. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विविध संघटनांना चर्चेच आवाहन केले आहे. शालेय मुलांना रस्त्यावर आणणे चुकीचे आहे, असे प्रत्युत्तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. आम्ही दोन वर्षे ऑनलाइन अभ्यास केला. त्यामुळे आता आम्हीही ऑनलाइन परीक्षा द्यावी, अशी मागणी काही विद्यार्थी संघटना करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विद्यार्थी संघटनांनी शाळकरी मुलांना एकत्र बोलावल्याचे चित्र दिसुन आले आहे. कुठे पोलिसांनी विद्यार्थ्यांना समज देऊन परत पाठवले, तर कुठे आंदोलन मागे घेण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच हे आंदोलन हिंदुस्थानी भाऊ'च्या निर्देशानुसार जमला होता का यावर चौकशी करुन कारवाई केली जाईल असे डीसीपी प्रणय अशोक यांनी सांगितले आहे.
Tweet
"We've been continuously discussing students' health & safety. I told students to have discussions with me; I'll decide further. But we also have to keep in mind the two-year loss in school students' education": Maharashtra School Education Minster Prof. Varsha Eknath Gaikwad pic.twitter.com/OJbp0PtkLT
— ANI (@ANI) January 31, 2022
संपूर्ण राज्यात ऑनलाइन परीक्षा घेणे अवघड झाले आहे. अनेक आदिवासी गावांमध्ये इंटरनेट कनेक्शन नाही. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा शक्य नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मार्चपासून परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळेच शाळकरी मुलांसोबत रॅली काढण्याऐवजी चर्चा करा, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही आंदोलनात भाग घेऊ नये. कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या भौगलिक परिस्थितीचा विचार करावा आणि काय समस्या असतील तर आमच्याशी चर्चा करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना असताना विद्यार्थ्यांना बाहेर का आणलं असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारल आहे. तर या मुलांना रस्त्यावर आणण्यासाठी तुम्ही मजबूर केलं असं प्रत्युत्तर हिंदुस्थानी भाऊ यांनी दिलं आहे. (हे ही वाचा कांदा-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत- Minister Kapil Patil)
विद्यार्थाच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ?
हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे. तसेच हिंदुस्थान भाऊ आपल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थीने भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, आहे असे म्हटले जात आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या, असं आवाहन हिंदुस्थानी भाऊने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना केलं आहे. मला तरुण वर्ग फॉलो करत आणि तरुण वर्गासाठी मी लढतो, त्यांच्यासाठी आयुष्यभर लढणार असं हिंदुस्थानी भाऊने म्हटलं आहे.