Representational Image (Photo Credit: File Image)

संघ लोकसेवा आयोगात (UPSC) विविध पदांसाठी नोकरभरती (Job Recruitment) केल्या जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवरांना UPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 ऑक्टोबर (October) असुन या पदभरतीबाबत सविस्तर माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. संघ लोकसेवा आयोगात वरिष्ठ रचना अधिकारी, वैज्ञानिक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहायक वास्तुविशारद, सहायक प्राध्यापक, औषध निरीक्षक या पदांसाठी पदभरती केल्या जाणार आहे. तरी या सर्व पदांसाठी आवश्यक ती शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) संघ लोकसेवा आयोगाकडून सुचित करण्यात आली आहे. तरी संघ लोकसेवा आयोग म्हणजे केंद्र सरकार कर्मचारी म्हणून काम करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.

 

तरी या पदासाठी अर्ज करण्यचा शुल्क 25 रुपये असुन एससी (SC), एसटी (ST) आणि महिला उमेदवारांना (Female Candidate) हा अर्ज मोफत भरता येणार आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे (Resume), दहावी (SSC), बारावी (HSC) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं (Degree Certificate), शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), मागासवर्गीय उमेदवारांना जातीचा दाखला (Caste Certificate) , आधारकार्ड (Aadhar Card) किंवा लायसन्स (Driving Licence) आणि पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photo) हे कागदपत्रे सोबत जोडणे अनिवार्य आहे. (हे ही वाचा:- GAIL Recruitment 2022: महारत्न गेल कंपनीद्वारे SC, ST, OBC आणि दिव्यांगांसाठी 77 पदांची विशेष भरती प्रक्रिया जारी; असा करा अर्ज)

 

वरिष्ठ रचना अधिकारी (Senior Design Officer)  पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना इंजिनिअरींगची मेकॅनिकल किंवा मरिन शाखेतील पदवी असणं अनिवार्य असणार आहे. तर वैज्ञानिक (Scientist)  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केमेस्ट्र, फिजीक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पद्युवित्तर शिक्षण घेणं आवश्यक असणार आहे. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Junior Scientific Officer) पदासाठी मास्टर इन फिस्जिक्स किंवा मास्टर इन माथेमॅटिक्स असणं गरजेचं आहे. तसेच सहायक वास्तुविशारद पदासाठी आर्किटेक्ट पदवी, साहायक प्राध्यापक आणि औषधी निरिक्षक पदासाठी डिग्री इन फार्मसी असणं बंधनकारक आहे.