UPSC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

UPSC CSE Final Merit List: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने सिव्हिल सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल (UPSC Final Result 2024) आज, 22 एप्रिल रोजी जाहीर केला आहे. UPSC CSE 2024 चा अंतिम निकाल उमेदवारांच्या मुख्य परीक्षेतील कामगिरी आणि मुलाखतीच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल PDF स्वरूपात आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://upsc.gov.in उपलब्ध आहे. जो आपण डाऊनलोड (UPSC Result PDF Download) करु शकता. यामध्ये भारतीय प्रशासन सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि इतर गट अ संवर्गातील पदांसाठी निवड करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार निकालाची यादी, स्कोअरकार्ड आणि कट-ऑफ तपशील अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात.

UPSC Final Result 2024: परीक्षेचा आढावा

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1129 पदांची भरती केली जाणार आहे. UPSC CSE 2024 ची पूर्व परीक्षा 16 जून 2024 रोजी घेण्यात आली होती, तर मुख्य परीक्षा 20 ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान देशभरात झाली. अंतिम टप्पा म्हणजे मुलाखतीचा फेरी 17 एप्रिल 2025 रोजी पार पडली होती. (हेही वाचा, Union Public Service Commission कडून December 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर)

परीक्षेचा तपशील:

संस्था: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)

परीक्षेचे नाव: UPSC CSE 2024

पूर्व परीक्षा: 16 जून 2024

मुख्य परीक्षा: 20 ते 29 सप्टेंबर 2024

मुलाखत फेरी: 17 एप्रिल 2025

एकूण पदे: 1129

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ: upsc.gov.in

UPSC Final Result 2024 कसा तपासावा?

UPSC चा अंतिम निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात:

  1. अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
  2. होमपेजवर "UPSC Final Result 2024" लिंकवर क्लिक करा.
  3. 'View Details' टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन विंडोमध्ये PDF उघडेल.
  5. Ctrl+F दाबा आणि आपला रोल नंबर शोधा.
  6. रोल नंबर आणि नाव जुळत असल्यास आपण पात्र ठरले आहात.
  7. PDF डाउनलोड करून भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

या निकालामुळे अनेक उमेदवारांचे आयुष्य बदलणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी पुढील टप्प्यांसाठी तयारी सुरू ठेवावी आणि अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी माहिती तपासत राहावी. UPSC Final Result 2024 PDF डाउनलोडसाठी थेट लिंक https://upsc.gov.in वर उपलब्ध आहे.

UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. ही भारतातील प्रमुख केंद्रीय भरती संस्था आहे जी नागरी सेवा परीक्षा (CSE) यासह विविध प्रतिष्ठित सरकारी सेवांसाठी परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे, जी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) सारख्या पदांसाठी उमेदवारांची निवड करते.