Results 2019 (File Image)

UPSC कंम्बाईन डिफेन्स सर्विसेस म्हणजेच (UPSC Combine Defence Services Exam 2) या परिक्षेचा अंतीम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. परिक्षा दिलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर (Website) निकाल पाहू शकतात. या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असुन लवकरचं उमेदवारांचे प्राप्त गुण उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. तरी UPSC CDS अंतीम परिक्षेच्या (Exam Final Result) निकालाची वाट बघत असणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी देशातील हजारो उमेदवार CDS परिक्षा देतात. या परिक्षेच्या माध्यमातून नौदल (Indian Navy), वायुदल (Indian Air Force) आणि भारतीय आर्मी (Indian Army) ऑफिसर्सच्या (Officers) रिक्त पदांसाठी पदभरती होतात.

 

असा पहा तुमचा निकाल :- 

सर्वप्रथम UPSC ची अधिकृत वेबसाइट (Official Website) upsc.gov.in वर जा. त्यानंतर होम पेजवरील '‘Combined Defence Services Examination II Written Exam Result II’ अशी एक लिंक तुम्हाला दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.त्यानंतर CDS 2 2022 Result अशी PDF असेल त्या लिंकवर क्लिक करा. CDS 2 निकाल 2022 PDF ऑपन करा. आता या निकालात तुमचा रोल नंबर किंवा नाव शोधा. त्यात तुम्हाला तुमचा रिसल्ट दिसेल. या वेबसाईटवर उपलब्द असलेल्या निकालाची तुम्ही सहज प्रिंट काढू शकता. (हे ही वाचा:- Job Recruitment: Mazagon Dock मध्ये नोकरीची संधी, मिळवा 80 हजारांहून अधिक पगार)

 

UPSC CDS परिक्षा देणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असली तरी UPSC Combine Defence Services Exam 2 अगदीचं काटोकोरपणे उमेदवारांची निवड करण्यात येते. आता हे उमेदवार कोण, कुठले आणि निकालासंबंधी सविस्तर माहिती UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. या परिक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना नौदल, वायुदल आणि भारतीय आर्मी यांत नोकरीची संधी मिळणार आहे. दरवर्षी इंडियन मिलिटरी अकादमी (Indian Military Academy), ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (Officers Training Academy), इंडियन नेव्हल अकादमी (Indian Navy Academy) आणि इंडियन एअर फोर्स (Indian Air Force) अकादमीमध्ये कमिशन्ड ऑफिसर्सच्या भरतीसाठी युनियन लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा घेतली जाते.