Job Recruitment: Mazagon Dock मध्ये नोकरीची संधी, मिळवा 80 हजारांहून अधिक पगार
(Photo credit: archived, edited, representative image)

केंद्र सरकारच्या (Central Government) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagaon Dock Shipbuilders Limited) नोकरभरती केल्या जाणार आहे.  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदावर नोकरभरती (Job Recruitment) केल्या जाणार आहे. या पदभरतीत 41 प्रकारच्या कामांचा समावेश असणार आहे. तरी 18 ते 38 वय (Age) असणाऱ्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज (Job Application) करता येणार आहे. तरी 30 सप्टेंबर (September) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड्ध्ये (Mazagaon Dock Shipbuilders Limited) होणारी ही पदभरती (Job Recruitment) तीन वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने केल्या जाणार आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगर भागातील अनेक स्थानिक तरुण-तरुणी रोजगारासाठी (Emplyoment) अवलंबून असतात. तरी या भागातील उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे.

 

 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagaon Dock Shipbuilders Limited) कडून एकूण 41 विभागातील जागांची भरती केल्या जाणार आहे. बिगर तांत्रिक (Non Technical) विभागासाठी ही पदभरती केल्या जाणार आहे. गॅस कटर (Gas Cutter), फिटर (Fitter), इलेक्ट्रिशियन (Electrician), विद्युत कर्मचारी, रिगर अशा विविध तांत्रिक कामांसह पॅरामेडिक्स (Paramedics), दर्जा पर्यवेक्षक, हिंदी भाषांतरकार (Hindi Translator) अशा काही विभागांसाठी ही भरती केल्या जाणार आहे. या जागांसाठी निवड होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 13 हजार ते 50 हजार किंवा 22 हजार ते 83 हजारांपर्यत  मासिक वेतन (Monthly Payment) मिळणार आहे. (हे ही वाचा:- Aurangabad Rojgar Melava: औरंगाबादेत प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा, हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी)

 

 

संबंधित नोकरभरतीबाबत माझगाव डॉकच्या (Mazagaon Dock Shipbuilders Limited)  अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तरी माझगाव डॉकमध्ये होणारी ही नोकरभरती (Job Recruitment) फक्त तीन वर्षाच्या कंत्राटवर होणार आहे. म्हणजे या नोकर भरतीतून मिळणारी नोकरी 2022 ते 2025 या दरम्यान शाश्वती असेल. तरी नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.