Aurangabad Rojgar Melava: औरंगाबादेत प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा, हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी
Job | File Photo

देशात दिवसेनदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. पदवीधर (Graduation) शिक्षण घेवून देखील अनेक तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. हल्ली सगळ्याचं क्षेत्रात नोकरीसाठी मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे.तरी नोकरीसाठी अर्ज (Application For Job) करणाऱ्यांची संख्या ही रिक्त जागांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येत आहे. म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्राम (Marathwada Muktisangram Din) दिनानिमित्त औरंगाबादेत (Aurangabad) प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठवाड्यातील (Marathwada) बेरोजगार युवकांनी रोजगार मिळण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी औरंगाबादेत असलेल्या नामांकित कंपन्यानी या मेळाव्यात उत्सफूर्त सहभाग नोंदवला असुन रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात येत आहे.

 

औरंगाबादेतील (Aurangabad) या रोजगार मेळाव्यास बालविकास विभाग मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), यांच्यासह केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad), कौशल्य विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांच्यासह विविध उद्योजक, आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade), आ.प्रशांत बांब (Prashant Bamb) यांनी उपस्थित दर्शवली होती. तरी औरंगाबादसह (Aurangabad) मराठवाड्याच्या (Marathwada) विकासासाठी आणि रोजगारांना चालना देण्यासाठी हा मेळाव्याचं आयोजन केल्याचं मान्यवरांनी सांगितलं. इंजिनीअरींग पदवी (Engineering), पॉलिटेक्नीक डिप्लोमा (Polytechnic), आयटीआय (ITI) तसेच इतर विज्ञान (Science), वाणिज्य व कला शाखा पदवीधर (Arts Graduation), दहावी (SSC) ,बारावी (HSC) उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध आहे. (हे ही वाचा:- SBI Clerk Recruitment 2022: बँकींग क्षेत्रात नोकरीची संधी, एसबीआयमध्ये नोकर भरती; जाणून घ्या पदसंख्या, पात्रता आणि अर्ज करण्याची मूदत)

 

औरंगाबादेतील या गोजगार मेळाव्यात बजाज ऑटो लि, एनआरबी बेअरींग प्रा.लि,फोर्ब्स ॲन्ड कंपनी लि, अजंता फार्मा लि , पॅरासन मशिनरी इंडिया प्रा.लि , अजित सीड्स प्रा. लि, न्युट्रीविडा न्युट्रास्युटिकल्स, नवभारत फर्टीलायजर, मराठवाडा ऑटो कॉम प्रा.लि, लुमीनाज सेफ्टी ग्लास प्रा.लि, लक्ष्मी मेटल प्रेसींग वर्क प्रा.लि, लक्ष्मी रिक्षा बॉडी पार्ट प्रा.लि, रत्नप्रभा कार्स प्रा.लि, मायलन लॅबॉरेटरीज, व्हेरॉक इंजिनीअरींग लि , पित्ती इंजिनीयरींग लि , ग्राइंड मास्टर मशीन इंडिया, प्रा.लि, गुडइयर साऊथ एसिया टायर्स प्रा. लि, पर्किन्स इंडिया प्रा.लि, इत्यादी औरंगाबाद जिल्ह्यातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी  www.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे वाहन प्रसासनाकडून करण्यात आले आहे.