UPSC Civil Services Examination 2019 Results: यूपीएससी 2019 चा निकाल जाहीर; देशार प्रदीप सिंह अव्वल, 'इथे' पाहा मेरिट लिस्ट
UPSC Representational Image (Photo Credits: PTI)

UPSC Civil Services Examination 2019 Results: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा 2019 परिक्षांचे अंतिम निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. नागरी सेवा परीक्षा 2019 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती नियुक्ती यादी जाहीर करण्यात आली आहे. देशात प्रदीप सिंह (Pradeep Singh) याने टॉप केले असुन त्यापाठोपाठ जतिन किशोर, प्रतिभा वर्मा (Pratibha Verma), हिमांशु जैन (Himanshu Jain), जयदेव सी.एस (Jeydev C.S)  यांनी टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. मराठमोळ्या नेहा भोसले (Neha Bhosale) हिने 15 वे तर मंंदार पत्की (Mandar Patki)  याने 22 वे स्थान मिळवले आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांची उपलब्ध जागांनुसार लवकरच नियुक्ती करण्यात येईल.तत्पुर्वी मेरिट लिस्ट कुठे पाहायची याबाबत जाणुन घ्या.

कुठे पहाल युपीएससी 2019 चा निकाल?

सिव्हिल सर्विस एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांमधून जावं लागतं. यामध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण पाहता अंतिम निकाल जाहीर केला जातो. यंदा जानेवारी मध्ये लेखी परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला होता तर मुलाखतीसाठी फेब्रुवारी पासून सुरूवात झाली होती. या नंंतर आता मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर यूपीएससी परीक्षेतील यशवंतांची यादी जाहीर करण्यात आली आहे. येथे क्लिक करून पहा सविस्तर यादी.

मेरिट लिस्ट नुसार, निवड झालेल्या उमेदवारांची IAS, IFS, IPS, आणि केंद्रीय सेवा ग्रुप A आणि B मध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांंमध्ये जनरल कॅटगरी मधील 304, EWS मधील 78, ओबीसी मधील 251, अनुसुचित जातींंमधील 129 तर अनुसुचित जमातींमधील 67 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.