UGC आता NTA द्वारा 2022-23 शैक्षणिक वर्षापासून घेणार UG, PG कोर्ससाठी CET परीक्षा
UGC | File Image | (Photo Credits: PTI)

युजीसी (University Grants Commission) ने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये आता अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स साठी सीईटी ( Common Entrance Test) परीक्षा होणार आहे. एनटीए (NTA) च्या माध्यमातून 2022-23 मध्ये या परीक्षा होऊ शकतात. तर पीचडी प्रोग्राम (PHD) साठी नेट स्कोअर (NET Score) द्वारा प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाईल असे देखील आता युजीसी ने सांगितल्या आहेत.

2022-23 साठी सेंट्रल युनिव्हर्सिटीजने सीईटी परीक्षा घेण्यासाठी तयारी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या परीक्षा एनटीए कडून सध्या किमान ग़मय करण्यासाठी देखील एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.   विद्यापीठांमध्ये 2021 पासून सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात येणार होते मात्र कोविड 19 मुळे या परीक्षांचे आयोजन होऊ शकलेले नाही. दरम्यान राज्य आणि खाजगि विद्यापीठाकडूनही अशाच प्रकारे त्यांच्या प्रवेशपक्रियेसाठी सीईटी घेण्याचा पर्याय अवलंबू शकतात असे सूचवले आहे. ही कम्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे.  नक्की वाचा: National Education Policy 2020: नव्या शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी; कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर .

केंद्रीय विद्यापीठांमध्ये DU, JNU,  BHU यांचा समावेश होतो. या विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी 3 तासांची परीक्षा 2 सेक्शन मध्ये होऊ शकते. कॉमन अ‍ॅप्टिट्युट टेस्ट (50 प्रश्न) आणि डोमेन स्पेसिफिक टेस्ट  (30 प्रश्न) असतील. त्यामुळे आता प्रत्येक विद्यापीठाकडून घेतल्या जाणार्‍या परीक्षा आता रद्द केल्या जाणार आहेत.