Representational Image (Photo Credit: File Image)

Supreme Court Recruitment 2021: सुप्रीम कोर्टाकडून ज्युनिअर ट्रान्सलेटरच्या एकूण 30 पदांसाठी नोकर भरती करण्यासंदर्भात एक नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या भर्ती 2021 अधिसुचना कार्यक्रमानुसार, रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया 15 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. त्यामुळे अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत भरती पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून अर्ज करण्यासह त्या बद्दलच्या काही गोष्टींबद्दल आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत.(Central Railway Recruitment 2021: अपरेंटिच्या 2500 पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक)

नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत आहे. अधिसूचनेनुसार, सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानुसार इंग्रजी भाषेतून विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी कोर्टात असिस्टंट पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. तर नोकर भरती बद्दल येथे अधिक जाणून घ्या.(IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 'या' पदासाठी जाहीर केली भरती; 26 फेब्रुवारीपर्यंत करू शकता अर्ज)

-इंग्रजी मधून हिंदीत भाषेसाठी ज्युनिअर ट्रान्सलेटर 5 पद

-इंग्रजी मधून आसामी भाषेसाठी ज्युनिअर ट्रान्सलेटर 2 पद

- इंग्रजी मधून बंगाली भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून तमिळ भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून गुजराती भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून उर्दू भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून मराठी भाषेसाठी 2 पद

- इंग्रजी मधून तमिळ भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून कन्नड भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून मल्याळम भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून मणिपूरी भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून उडिया भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून पंजाबी भाषेसाठी 2 पद

-इंग्रजी मधून नेपाळी भाषेसाठी 2 पद

अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून इंग्रजी आणि संबंधित क्षेत्रीय भाषेसाठी उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचसोबत इंग्रजी भाषेमधून डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट मिळालेले असावे. त्याचसोबत त्यात 2 वर्षाचा अनुभव असल्याचे ही नमूद केलेले असावे.