IOCL (Photo Credit - Facebook)

IOCL Recruitment 2021: इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited, IOCL) ने टेक्निकल अपरेंटिस (Technical Apprentice) आणि नॉन-टेक्निकल ट्रेंड अपरेंटिस (Non-Technical Trade Apprentice) च्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्याअंतर्गत एकूण 505 जागा भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवाराला या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल, त्यांनी IOCL च्या अधिकृत iocl.com या वेबसाईटला भेट द्यावी आणि ऑनलाईन अर्ज करावा. IOCL अपरेंटिस भर्तीसाठी उमेदवार 26 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

आयओसीएलने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शॉर्टलिस्टेड उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही परीक्षा 14 मार्च 2021 रोजी घेण्यात येईल. ही भरती पूर्व क्षेत्र, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड आणि आसाम या ठिकाणी केली जाईल. (वाचा - Indian Army GD Constable Recruitment 2021: 8वी ते 12वी पास तरूणांना सैन्य दलात सरकारी नोकरीची संधी; 5 मार्च पर्यंत करा अर्ज)

या तारखा लक्षात ठेवा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 28 जानेवारी 2021

ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - 26 फेब्रुवारी 2021

आयओसीएल अ‍ॅप्रेंटिस प्रवेश पत्र देण्याची तारीख - 01 मार्च 2021

आयओसीएल अ‍ॅप्रेंटिस परीक्षेची तारीख - 14 मार्च 2021

आयओसीएल अॅप्रेंटिस परीक्षेच्या निकालाची तारीख - 25 मार्च 2021

ट्रेंड अ‍ॅप्रेंटिस पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचवेळी या पदावर ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवार 18 ते 24 वर्षांच्या दरम्यानचे असावेत. या व्यतिरिक्त ट्रेंड अ‍ॅप्रेंटीस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तसेच डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 15 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या व्यतिरिक्त ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 14 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.

अशी होईल निवड -

अॅप्रेंटिस पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. या व्यतिरिक्त भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत पोर्टलवर अधिसूचना वाचू शकतात.