Exam | Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

सीए परीक्षा 2021 (CA Exams 2021) साठी बसणाऱ्या परीक्षर्थींसाठी opt-out पर्याय देण्याचे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) Institute of Chartered Accountants of India (ICAI) ला आदेश दिले आहेत. सीएची परीक्षा 5 जुलै पासून सुरु होणार आहे. परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कोविड-19 ची लागण झाली असल्यास अधिकृत डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट दाखवून ते परीक्षा देणे टाळू शकतात, असे कोर्टाने म्हटले आहे. यापूर्वी ICAI ने परीक्षार्थींना RT-PCR टेस्ट करण्यास सांगितले होते. मात्र कोर्टाने आता तो निर्णय मागे घेतला आहे.

न्यायाधिश एएम खानविलकर, दिनेश महेश्वरी आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर आज सीए परीक्षा संदर्भातील सुनावणी करण्यात आली. यात विविध मुद्द्यांवरुन जारी केलेल्या SOP वर सुप्रीम कोर्टाने सवाल उपस्थित केले. दरम्यान, खंडपीठाला ही SOP योग्य न वाटल्याने ICAI ला यात बदल करण्याचे सुचवले आहे.

सीए परीक्षेसाठी सुप्रीम कोर्टाने जारी केलेली Opt-out Scheme काय आहे?

# स्वत:ला किंवा कुटुंबातील सदस्याला कोविड-19 ची लागण झाल्यास अधिकृत डॉक्टरांकडून सर्टिफिकेट सादर करुन परीक्षार्थी परीक्षा देणे टाळू शकतात. तसंच हा attempt म्हणून मानला जाणार नाही. पुढे नोव्हेंबर मध्ये त्यांना परीक्षा देता येईल.

# या परिस्थितीत परिक्षार्थींना जूना आणि नवा कोर्स 2021 मध्ये रिपीट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

# Opt-out साठी परीक्षार्थीना RT-PCR टेस्ट रिपोर्ट सादर करण्याची गरज नाही.

# शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रात बदल करण्याच्या ICAI च्या मुद्दाला खंडपीठाने नकार दिला आहे.

परीक्षांच्या नियमांमध्ये बदल न करण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. परंतु, opt out हा पर्याय परिक्षार्थींना विनाकारण वापरता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले आहे.

दरम्यान, सीएच्या अंतिम परीक्षा 5 ते 19 जुलै दरम्यान होणार आहेत. तर CA Inter परीक्षा 6 जुलै आणि CA Foundation परीक्षा 20 जुलै रोजी होणार आहे.