Representational Image (Photo Credits: PTI)

आगामी होणाऱ्या महाराष्ट्र बोर्डाच्या परिक्षांबाबत मोठे बदल करण्यात आले आहे. एसएससी आणि एचएससी म्हणजेच दाहावी आणि बारावी बोर्ड परिक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. गेले दोन वर्ष कोरोना महामारीच्या पार्शभुमिवर काही महत्वाचे बदल करण्यात आले होते. परिक्षा पध्दती, परिक्षेचा कालावधी, परिक्षा केंद्र याबाबत विशेष फेरबदल केले होते. म्हणजेचं २०२१ आणि २०२२ या कालावधीत एसएससी आणि एचएससी परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास म्हणजे अडीच तासाच्या ऐवजी तीन तास कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच इतर परिक्षा केंद्र न देता होम सेंटर म्हणजेचं स्वच्याचं शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालायात जावून पेपर द्यायचे होते. एवढचं नाही तर एकूण अभ्यासक्रमापैकी २५ टक्के अभ्याक्रम वगळण्यात आला होता. पण आता कोरोना महामारीचे सर्वप्रकारचे निर्बंध उठल्यानंतर परिक्षा नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.

 

2023 मध्ये होणाऱ्या एचएससी आणि एसएससी परिक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर होणार आहेत. तसेच दहावी बारावीच्या २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी होम सेंटर राहणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना बोर्डाकडून अलॉट केलेल्या सेंटरवर जावून परिक्षा द्यावी लागणार आहे. तर 80  गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी दिला जाणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना ८० गुणांचा पेपर आता फक्त अडीच तासात सोडवावा लागणार आहे. तसेच यावेळी १०० टक्के अभासक्रमावर परिक्षा होणार आहे. (हे ही वाचा:- CBSE 10th,12th Exam 2023 Date Sheets: सोशल मीडीयात सीबीएसई परीक्षांच्या तारखांचे Viral WhatsApp Messages खोटे; बोर्डाने दिली माहिती)

 

औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. तरी राज्यभरातील एसएससी आणि एचएससी विद्यार्थ्यांनी याबाबत नोंद घ्यावी. राज्यभरातील शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयाला देखील याबाबत सविस्त माहिती देण्यात आली आहे. दोन वर्षाच्या दिलासादायक परिक्षा निर्णयानंतर या वर्षी मात्र विद्यार्थ्यांची चांगलीचं कसोटी लागणार आहे. तरी २०२२-२०२२ या शैक्षणिक वर्षाची परिक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे.