Representational Image (Photo Credits: PTI)

State Bank Of India Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यासाठी एक परिपत्रक ही जाहीर करण्यात आले आहे. एकूण 19 रिक्त पदांवर योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यामुळे या नोकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी बँकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in येथे नोटिफिकेशन पाहू शकता. त्याचसोबत उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, अर्ज नीट वाचून झाल्यानंतरच तो भरवा. कारण त्यामध्ये काही चुका झाल्यास अर्ज स्विकारला जाणार नाही.

असिस्टंट मॅनेजर मार्केटिंग अॅन्ड कम्युनिकेशनच्या 4 आणि चीफ मॅनेजरच्या 2, मॅनेजर एसएमई प्रोडक्टके 6 पदावर नियुक्ती केली जाणार आहे. तर डेप्युटी मॅनेजर चार्टड अकाउंट्सच्या 7 पदावर नियुक्ती केली जाईल. एसबीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या या नोकर भरतीच्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांची निवड शॉर्टलिस्ट आणि इंटरव्यूच्या आधारावर केली जाणार आहे.(SBI PO Mains Admit Card 2021 जारी; sbi.co.in वरून अशी करा डाऊनलोड)

चीफ मॅनेजर (कंपनी सेक्रेटरी) च्या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इंस्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) चे सदस्य असण्यासह कमीतकमी 7 वर्षांचा अनुभव असावा. तर मॅनेजर (एसएमई प्रोडक्ट) च्या पदसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीए/पीजीडीएमची डिग्री घेतलेली असावी.

मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये सामान्य/ईडब्लूएस/ओबीसीच्या आधारावर 750 रुपये द्यावे लागणार आहेत. तर एससी/एसटी/पीडब्लूडी उमेदवारांना कोणतेही शुल्क अर्जासाठी भरावा लागणार नाही आहे.