SBI PO Mains Result 2021 जाहीर; sbi.co.in वर असा पहा तुमचा  स्कोअर
State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून आज Probationary Officer mains exam result 2021 जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना SBI PO Mains Exam Result 2021 हा बॅंकेची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर पाहता येणार आहे. प्रिलिम परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेले उमेदवार मुख्य परीक्षा देऊ शकतात. यंदा ही मुख्य परीक्षा 2 जानेवारी 2022 दिवशी पार पडली होती. प्रिलिम्स परीक्षेचा निकाल 16 डिसेंबर 2021 दिवशी लागला होता. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची यादी बनवण्यात आली. आता मुख्य परीक्षेमधून शॉर्ट लिस्ट झालेले विद्यार्थी फेझ 3 साठी अर्थात मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहेत. मुलाखतीची फेरी यंदा फेब्रुवारी 2022 च्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात होणार आहे. तर अंतिम निकाल मार्च 2022 मध्ये जाहीर केला जाईल. हे देखील नक्की वाचा: RBI Recruitment 2022: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मध्ये Specialist Officer ची नोकरभरती; 4 फेब्रुवारी पर्यंत करा rbi.org.in वर अर्ज.

कसा डाऊनलोड कराल निकाल?

  • एसबीआय च्या वेबसाईटला भेट द्या.
  • होमपेजवर “Careers” टॅब वर क्लिक केल्यानंतर नवं पेज ओपन होईल.
  • “Join SBI” टॅब खाली “Current Openings”वर क्लिक करा.
  • RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS खाली असणार्‍या “Main Examination Result” वर क्लिक करा.
  • तुमचा निकाल एका पीडीएफ स्वरूपात दिसणार आहे. यामध्ये केवळ तुमचा निकाल पाहण्यासाठी Ctrl+F कमांड देऊन तुमचा रोल नंबर टाका. म्हणजे तुमचे मार्क्स कळतील.
  • दरम्यान हा निकाल डाऊनलोड करून प्रिंट आऊट देखील करू शकता.

दरम्यान या परीक्षेमध्ये सेक्शनल कट ऑफ लिस्ट नसेल. तिसर्‍या टप्प्यासाठी एकूण जागांच्या तिप्पाट विद्यार्थी शॉर्टलिस्ट केले जातात. ही लिस्ट किमान अग्रिग्रेट क्वालिफाईंग स्कोअर वर बनवली जाते. अधिक माहितीसाठी तुम्हांला वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.