RBI | (File Image)

आरबीआय (Reserve Bank of India) कडून Specialist Officer या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दरम्यान जे या पदासाठी उत्सुक आहेत त्यांना आरबीआयची अधिकृत वेबसाईट rbi.org.in यावर अर्ज करता येणार आहे. 15 जानेवारीपासून त्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 फेब्रुवारी आहे. याप्रक्रियेमध्ये 14 जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे डिरेक्ट लिंक वरही तुम्ही भेट देऊ शकता.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

Law Officer Grade B: 2 जागा

Manager (Technical-Civil): 6 जागा

Manager (Technical-Electrical): 3 जागा

Library Professional (Assistant Librarian) Grade A: 1 जागा

Architect Grade A: 1 जागा

Full-Time Curator: 1 जागा

महत्त्वाच्या तारखा

online RBI SO Application ची सुरूवात - 15 जानेवारी 2022

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 4 फेब्रुवारी 2022

RBI SO परीक्षेची तारीख - 6 मार्च 2022

(हे देखील नक्की वाचा: IBPS Exam Calendar 2022–23 Released: क्लार्क ते RRB Exams साठी तयारी करणार्‍यांसाठी ibps.in वर परीक्षांच्या तारखा जारी; इथे पहा वेळापत्रक).

वयो मर्यादा

Manager (Technical-Civil), Manager (Technical-Electrical)या पदांसाठी अर्ज करणार्‍यांचे वय 21-35 वर्ष असणं आवश्यक आहे. तर Library Professional (Assistant Librarian) Grade A, आणि Architect Grade A साठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष आहे. Law Officer Grade B साठी 21 ते 32 वर्ष आहे. Curator( Full-Time)साठी अर्ज करणार्‍यांची वयोमर्यादा 25ते 50 वर्ष असणं आवश्यक आहे.

RBI Recruitment 2022 पात्रता निकष

  • Law Officer Grade B- लॉ विषयाची बॅचलर डिग्री, किमान 50% मार्क्स आवश्यक
  • Manager (Technical-Civil)– Civil Engineering मध्ये बॅचलर डिग्री 60% मार्क्स सह
  • Manager (Technical-Electrical) – इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंग मध्ये बीई/ बी टेक. 60% मार्क्स सह

ऑनलाईन परीक्षेद्वारा संबंधित पदांवर उमेदवार निवडले जाणार आहे. त्यामुळे यासाठी अर्ज करण्यासाठी rbi.org.in ला भेट देऊन योग्य पदाची निवड करा.