File image of the Reserve Bank of India | (Photo Credits: PTI)

RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सुरक्षा रक्षकांच्या रिक्त पदांसाठी (Security Guard) भरती केली आहे. त्याअंतर्गत एकूण 241 जागा भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत, ते उमेदवार अधिकृत पोर्टल rbi.org.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. इच्छुक आणि पात्र माजी सैनिक 22 जानेवारी 2021 ते 12 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या पदासाठी अर्ज करू शकतात. आरबीआय भरती 2021 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. (वाचा - JEE Main 2021: जेईई मुख्य परीक्षेच्या 2021 च्या पहिल्या टप्प्यातील अर्जाच्या प्रक्रियेसाठी उद्या शेवटची तारीख; jeemain.nta.nic.in वर लवकर करा Apply)

पात्रता -

सिक्युरिटी गार्ड पोस्टवर ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवार माजी सैनिक असले पाहिजेत. कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळाकडून उमेदवाराकडे दहावी किंवा मॅट्रिक पास प्रमाणपत्र असावे. याशिवाय आरबीआय भरती 2021 साठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, ओबीसींसाठी वयोमर्यादा 28 व अनुसूचित जाती व जमातींसाठी 30 वर्षे असावी.

निवड -

सुरक्षा गार्ड पदावर उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होईल. लेखी परीक्षेत रीझनिंग, इंग्रजी, संख्यात्मक क्षमता संबंधित प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असेल. कोणत्याही परीक्षेत निगेटिव मार्किंग होणार नाही. आरबीआय 2021 सिक्युरिटी गार्डची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक तपासणीसाठी उपस्थित रहावे लागेल.

या तारखा लक्षात ठेवा -

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल - 22 जानेवारी 2021

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख - 12 फेब्रुवारी 2021

ऑनलाईन लेखी परीक्षा - फेब्रुवारी ते मार्च 2021 दरम्यान घेण्यात येईल.

रिक्त पदांची संख्या -

सामान्य - 113

ओबीसी - 45

ईडब्ल्यूएस - 18

एससी -32

एसटी-33

 

वेतन -

आरबीआय भरती 2021 साठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 10940 पगार देण्यात येईल. सर्व उमेदवारांना अंतरिम शुल्क भरावे लागेल.