Students | Twitter

'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) चं यंदा 8वं वर्ष आहे. दरवर्षी बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांवरील परीक्षेच्या दृष्टीने असलेला मानसिक त्रास कमी करण्यासाठी या खास उपक्रमाचं आयोजन केले जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या निमित्ताने विद्यार्थी, पालक, शिक्षकांसोबत संवाद साधतात. त्यांना परीक्षेला सामोरं जाण्यासाठी प्रेरित करतात. प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होऊ न शकणारे ऑलाईन देखील यामध्ये सहभागी होता. दरम्यान यंदाच्या सत्रासाठी 14 डिसेंबर पासून रजिस्ट्रेशन सुरू झाले असून 14 जानेवारी 2025 पर्यंत ते खुले राहणार आहे.

2025 मधील यंदाचं हे 'परीक्षा पे चर्चा' सत्र नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम मध्ये आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये 2500 विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षा मंत्रालयाकडून विशेष PPC kits मिळते. तसेच जगभर असलेल्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी Ministry’s official website आणि YouTube चॅनेल वर त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाते. CUET-UG Update: आता 12 वी नंतर सीयूईटी यूजी परीक्षेसाठी विषयांचं बंधन नसेल; UGC ची माहिती .

Pariksha Pe Charcha 2025 साठी कसं कराल रजिस्ट्रेशन?

  • innovateindia1.mygov.in ला भेट द्या.
  • आता होमपेजवरील ‘Participate Now’ला भेट द्या.
  • आता Student (Self Participation or through Teacher Login), Teacher आणि Parent यापैकी तुमचा पर्याय निवडा.
  • आता तुमचं नाव, इमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका.
  • आता तुमचा फॉर्म भरा आणि सबमीट करा.

मंत्रालयाने 12 ते 23 जानेवारी 2025 या कालावधीत योगा सत्रे, पोस्टर मेकिंग, मीम्स स्पर्धा आणि मानसिक आरोग्य कार्यशाळा यासह उपक्रमांचे नियोजन केले आहे. PPC शैक्षणिक यशाला प्रेरणा देऊन विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहे.