नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) कडून यंदाच्या नीट 2022 परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 20 मे पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. पूर्वी नीट 2022 अंडर ग्रॅज्युएट (NEET UG 2022 exam) साठी अर्ज करण्याची मुदत 15 मे 2022 पर्यंत होती. पण यामध्ये वाढ करण्यात आली आहे. वैद्यशास्त्राचे विद्यार्थी NTA NEET 2022 साठी अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर अर्ज करू शकतात.
नीट परीक्षेचा पेपर 200 गुणांचा असतो. यासाठी 200 मिनिटांचा वेळ असतो. भारताप्रमाणेच भारताबाहेरील देखील 14 शहरांत यंदा ही परीक्षा होणार आहे. PIB Fact Check: नव्या वेळापत्रकानुसार 9 जुलैला NEET PG Exam? जाणून घ्या वायरल नोटिफिकेशन वर पीआयबी फॅक्ट चेकचा खुलासा.
कसा कराल अर्ज?
अधिकृत वेबसाईट NTA- neet.nta.nic.in ला भेट द्या.
"Registrations for NEET UG 2022" यावर क्लिक करा.
रजिस्टर करून तुमची माहिती भरा
आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
आता फॉर्मची प्रिंट आऊट काढून ठेवा.
NEET UG registration last date has been again extended from May 15 to May 20. #PostponeNEETUG pic.twitter.com/KFNJqrrJqi
— NEET(UG)/JEE Students Association (@NUSA_NEETUG) May 16, 2022
नीट युजी परीक्षा 17 जुलै दिवशी 543 शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पेन पेपर मोड मध्ये हि परीक्षा 13 भाषांमध्ये देण्याची मुभा आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना एमबीबीएस, बीडीएस, आयुष डिग्री, बीएससी नर्सिंग़, बीएससी लाईफ सायंस आणि वेटनरी कोर्स यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
नीट 2022 साठी अर्ज करताना जनरल कॅटेगरी मधील विद्यार्थी 1600 रूपये शुल्क, तर जनरल ईडब्ल्यूएस, ओबीसी, एनसीएल कॅटेगरी मधील विद्यार्थी 1500 रूपये भरून अर्ज करू शकणार आहेत.