Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेल्या यंदाच्या एनटीए कडून घेण्यात येणार्‍या विविध परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. National Testing Agency च्या नोटिफिकेशन नुसार, JEE 2023 Main यंदा दोन सत्रामध्ये देण्यात येणार आहे. यासाठी 13 प्रादेशिक भाषांचा पर्यायही विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. जेईई मेन्स परीक्षा (JEE Main Exam) जानेवारी 2023 आणि एप्रिल 2023 मध्ये देता येईल. त्यासाठीचं रजिस्ट्रेशन देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

यंदा अन्य परीक्षांचे देखील विद्यार्थ्यांना नियोजन करता यावं या अपेक्षेतून नीट 2023, CUET परीक्षांचा देखील तारखा आधीच जाहीर करण्यात आल्या आहे. यंदा नीट परीक्षा 7 मे 2023 दिवशी तर CUET परीक्षा 21-31 मे 2023 दरम्यान होणार आहे. नक्की वाचा: JEE Main, NEET, CUET 2023 Exam Dates: आगामी शैक्षणिक वर्षापासून NTA Exams साठी तयार होणार निश्चित कॅलेंडर; nta.ac.in वर आठवडाभरात यंदाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता. 

परीक्षा जसजशा जवळ येणार आहेत तशा examination city slip आणि admit card जारी करण्याचा तारखा आणि त्या डाऊनलोक करण्याच्या तारखा देखील एनटीए जारी करणार आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यासाठी अधिकृत वेबसाईट्स वर वेळोवेळी जारी केली जाणारी नोटिफिकेशन पहावी लागणार आहे.

आयआयटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई परीक्षा ही महत्त्वाची आहे. जेईई मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स याच्या माध्यमातून त्यासाठीची प्रवेशप्रक्रिया पार पाडली जाते.