Examinations | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

नॅशनल मेडिकल कमिशन कडून National Eligibility cum Entrance Test Postgraduate (NEET-PG) 2025 परीक्षेची संभाव्य तारीख जाहीर केली आहे.एका इंटर्नल नोटीसीद्वारा ही माहिती देण्यात आली आहे. या नोटिशीनुसार, (NBEMS) यंदा NEET PG 2025 परीक्षा 15 जून 2025 दिवशी घेण्याचा अंदाज आहे. नोटीशीमधील माहितीनुसार, NMC ने नमूद केले आहे की NMC अंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड (PGMEB), NBEMS सोबत, NEET-PG 2025 परीक्षा आणि पात्रतेसाठी इंटर्नशिप पूर्ण होण्याच्या तारखेबद्दल चर्चा केली.  विद्यापीठाच्या माहितीनुसार, इंटर्नशिप पूर्ण होण्याची तारीख 31 जुलै 2025 अशी सेट केली जाईल आणि NEET-PG 2025 परीक्षा तात्पुरती 15 जून 2025 रोजी घेतली जाईल.

NBEMS बोर्डाने आयोजित केलेल्या सर्व वैद्यकीय परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक समोर आले आहे. NBE Exam Calendar 2025 मध्ये NEET MDS 2025 ची परीक्षा 31 जानेवारी 2025, NEET SS 2024 परीक्षा दोन दिवस होणार आहे. ही परीक्षा 29, 30 मार्च 2025 ला होणार आहे. नक्की वाचा: Jay Kishore Pradhan, वयाच्या 64 व्या वर्षी निवृत्त SBI अधिकार्‍याने पास केली NEET परीक्षा.

 NEET-PG 2025 परीक्षा तारीख

 

यापूर्वी, NBEMS ने बोर्डाद्वारे घेतलेल्या सर्व वैद्यकीय परीक्षांसाठी तात्पुरतं वेळापत्रक जारी केले होते. NBEMS ने डिसेंबर 2024 मध्ये FMGE आणि NBEMS डिप्लोमा Final Theory Examination साठी बुलेटिन आणि वेळापत्रक देखील जारी केले आहे.