NEET | (Photo credit: archived, edited, representative image)

आजकाल अनेकांना त्यांच्या करियर बाबत अनिश्चितता असते त्यामुळे करियरअची निवड करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये एक घटक वय देखील असते. पण इच्छा तिथे मार्ग असतोच या उक्तीचं अजून एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे. 64 वर्षीय निवृत्त रिटायर्ट एसबीआय अधिकारी जय किशोर प्रधान ( Jay Kishore Pradhan) यांनी 2020 मध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

एसबीआय बॅंकेमध्ये डेप्युटी मॅनेजर पदावरून ते निवृत्त झाले आहेत. बॅंकिंग मध्ये आयुष्य घालवल्यानंतर त्यांनी डॉक्टर होण्याचं आपलं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी नीट परीक्षेसाठी ऑनलाईन क्लास देखील लावले. निवृत्तीनंतर पुना शिक्षण, अभ्यास सुरू करणं हे एक आव्हान असलं तरीही आता प्रधान यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Veer Surendra Sai Institute of Medical Sciences and Research (VIMSAR)मध्ये त्यांना डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेण्याकरिता जागा मिळाली आहे. नीट च्या परीक्षेसाठी वयाची कमाल मर्यादा नाही. प्रधान यांचे उत्तम उदाहरण आहे ज्यामध्ये MBBS च्या शिक्षणासाठी आवड असलेले उमेदवार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी होऊ शकतात.