NEET MDS Result 2023: नीट एमडीएस चा निकाल natboard.edu.in वर जाहीर; 1 मार्च रोजी घेण्यात आली होती परीक्षा
Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

NEET MDS Result 2023: नीट एमडीएस रिजल्ट (NEET MDS) चा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट- मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (NEET MDS) चा निकाल अधिकृत वेबसाइट natboard. edu.in वर जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार पोर्टलवर जाऊन निकाल तपासू शकतात.

1 मार्च 2023 रोजी NEET MDS 2023 ची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. शिवाय, उमेदवारांचे वैयक्तिक स्कोअरकार्ड 20 मार्च 2023 रोजी किंवा नंतर अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी, खाली सोप्या पायऱ्या दिल्या आहेत. ज्याचे अनुसरण करून उमेदवार निकाल पाहू शकतात. (हेही वाचा - Maharashtra Board HSC Exams 2023: 12वी इंग्रजीच्या पेपर मध्ये 3 चूका; विद्यार्थ्यांना मिळणार 6 गुण)

असा तपासा NEET MDS परीक्षेचा निकाल -

NEET MDS निकाल तपासण्यासाठी, सर्व उमेदवारांनी प्रथम NBEMS च्या अधिकृत वेबसाइटला nbe.edu.in किंवा natboard.edu.in भेट द्यावी. आता NEET-MDS 2023 चा निकाल वर क्लिक करा. स्क्रीनवर एक PDF दिसेल. त्यानंतर नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. आता स्क्रीनवर NEET MDS PDF दिसेल. NEET MDS निकाल पहा आणि डाउनलोड करा. त्यानंतर तुम्ही निकालाची प्रिंटआउट घेऊ शकता.