कोरोना व्हायरस (Coronavirus), लॉकडाउन (Lockdown) मुळे लांंबणीवर पडलेली नीट (NEET Exams) वैद्यकीय प्रवेश परिक्षा आज देशभरात पार पडणार आहे. प्राप्त माहितीनुसार देशभरात 15 लाख तर एकट्या महाराष्ट्रात एकुण 2.3 लाख विद्यार्थी नीटची परिक्षा देणार आहेत. दुपारी 2 ते 5 यादरम्यान परिक्षा होणार असुन तत्पुर्वी 11 ते 1.30 वाजेपर्यंंत विद्यार्थ्यांंना परिक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. तत्पुर्वी काल विद्यार्थ्यांंना आपआपल्या परिक्षा केंद्राविषयी अपडेट देणारा मेल/मॅसेज पाठवण्यात आला होता खबरदारी म्हणुन हा पत्ता बरोबर असल्याची खात्री NTA च्या वेबसाईट वर जाउन करुन घ्यावी. कोरोना च्या पार्श्वभुमीवर, एका वर्गात केवळ 12 विद्यार्थी बसविण्याची तयारी सुरू असल्याने काही प्रमाणात सेंटर वाढविले गेले आहेत . NEET Exam 2020: नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी Mumbai Local ने प्रवास करण्याची मुभा; अॅडमिट कार्डच्या आधारावर मिळेल प्रवेश
कोरोनाकाळात परिक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार अअहे म्हणत विरोधी पक्ष नेते राहुल गांंधी तसेच महाराष्ट्रात आमदार आदित्य ठाकरे यांंनी परिक्षा पुढे ढकलाव्यात किंंवा रद्द कराव्यात अशी विनंंती केली होती, अनेक विद्यार्थी संघटनांकडुन सुद्धा सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती मात्र विद्यार्थ्यांंच्या शिक्षणाशी खेळ नको म्हणत न्यायालयाने सुद्धा परिक्षा घेण्यास हिरवा कंंदील दर्शवला होता. परिक्षा घेताना विद्यार्थ्यांंच्या आरोग्याची अजिबात हेळसांंड होणार नाही यासाठी खालील तरतुदी करण्यात आल्या आहेत..
- परिक्षा केंंद्रावर एका वर्गात केवळ 12 विद्यार्थी असतील.
- केंद्रावर विद्यार्थ्यांंना तीन लेअरचा मास्क व ग्लोव्ह्ज पुरवण्यात येईल
- एकाच वेळी गर्दी होउ नये यासाठी सकाळी 11 पासून केंद्रावर तपासणी आणि Sanitize केले जाईल.
-ज्यांचे शरीराचे तापमान निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा उमेदवारांसाठी आयसोलेशन रूम असतील.
यावर्षीपासुन महाराष्ट्रात वैदकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी असणारा 70:30 फॉर्म्युला रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी केवळ नीट परिक्षेच्या मेरिट चाच निकष पाळला जाणार आहे.