Education | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये "इंडीया"च्या जागी "भारत" असे छापण्यात यावे या प्रस्तवाास राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) पॅनेलने बहुमताने मान्यता दिली. परिणामी, NCERT पुस्तकांचे आगामी संच छापाईवेळी नव्या बदलांची नोंद घेऊनच छापली जातील हे स्पष्ट झाले आहे. अनेक महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव मांडण्यात आला असला तरी आता त्याला समितीची अधिकृत मान्यता मिळाली नव्हती. जी आज मिळली. समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये "Hindu victories" समाविष्ट करण्यावर भर देण्याचीही सूचना केली आहे.

भारत की इंडिया या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ASEAN कार्यक्रमाचे निमंत्रणामध्ये पंतप्रधान मोदींना "भारताचे पंतप्रधान" म्हणून संबोधण्यात आले होते. त्यानंतर इंडिया की भारत या वरुन वाद निर्माण झाला होता. 'भारताच्या अध्यक्षा'च्या वतीने 9 सप्टेंबर रोजी G20 डिनरसाठी पाठवण्यात आलेल्या निमंत्रणामुळे हा वाद आणखी वाढला.

एक्स पोस्ट

विशेष म्हणजे, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी "भारत" या शब्दाच्या अर्थाचा बचाव करताना प्रतिपादन केले की, भारत हे संविधानात चांगले प्रतिबिंबित झाले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "इंडिया म्हणजे भारत हे संविधानात आहे. मी प्रत्येकाला ते वाचण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो