NABCONS Recruitment 2021: नाबार्डच्या 'या' कंपनीत 22 रिक्त पदांसाठी नोकर भरती, 1.5 लाख रुपये वेतन मिळणार
Representational Image | Bullet Train (Photo Credits: PTI)

NABCONS Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या सब्सिडियरी कंपनी नाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेसमध्ये ऑफ-फॉर्म डेव्हलपमेंटच्या 22 पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठी एक जाहीरात सुद्धा झळकवण्यात आली असून मुंबईतील हेड ऑफिसमध्ये सीनियर कंसल्टेंट आणि विविध राज्यांमध्ये असलेल्या कार्यालयात ज्युनियर कंसल्टेंट पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट http://nabcons.com वर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 15 मे पासून सुरु झाली असून 29 मे अंतिम तारीख आहे.(MHA Recruitment 2021: गृह मंत्रालयात लॉ ऑफिसर आणि अकाउंट्स ऑफिसरह 'या' पदांवर नोकर भरती, 24 मे पर्यंत करता येईल अर्ज)

सिनियर कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रामीण विकास, ग्रामीण प्रबंधन, एग्री बिझनेस मध्ये कमीतकमी 60 टक्के गुणांसह पीजी किंवा एमबीए डिग्री घेतलेली असावी. तसेच संबंधित कार्यात कमीतकमी 10 वर्षांचा अनुभव असावा. तर उमेदवाराचे वय 1 मे 2021 रोजी 40 वर्षांहून कमी आणि 50 वयापेक्षा कमी असावे. या पदासाठी वेतन 1.5 लाख रुपये दिले जाणार आहे.(SBI Clerk Recruitment 2021: एसबीआयमध्ये ज्युनियर असोसिएट पदांसाठी नोकर भरती, उमेदवारांना sbi.co.in वर करता येईल अर्ज)

तसेच ज्युनियर कंसल्टेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीए किंवा आयटी/कंप्युटर एका विषय आणि कमीतकमी 60 टक्के गुणांसह ग्रॅज्युएट डिग्री घेतलेली असावी. तसेच संबंधित कार्यात कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त उमेदवाराचे वय 1 मे 2021 रोजी 25 वर्षाहून कमी किंवा 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 40 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.